आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'नरेंद्र मोदी २०१४ ला नसतील एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- उत्तरप्रदेशमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी आग्रा येथे होत असलेल्या चिंतन बैठकीत पंतप्रधान कोण होणार ? या प्रश्नांवर चर्चा सुरु आहे. ताजमहाल आणि यमुनाचे म्हणून प्रसिद्घ असलेल्या आग्रा शहरात भाजपचा भावी चेहरा कोण यावर चिंतन होत आहे. पक्षाला पंतप्रधानपदाचा उमेदवार मिळत नसतानाच यूपीमध्येही जनाधार वाढविणारा नेता नसल्याचे भाजपपुढे मोठा चिंतेचा विषय बनला आहे.
सोमवारी आग्रा येथे पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी पोहचले तेव्हा त्यांनी सांगितले होते की, भाजपतर्फे पंतप्रधानपदासाठी कोणालाही प्रोजेक्ट करण्यात येणार नाही. भावी पंतप्रधानपदाबाबत एनडीए निवडणुकीनंतर निर्णय घेईल. तसेच पक्षातील पंतप्रधानपदासाठी लायक उमेदवरांची नावे घेतली. त्यात लालकृष्ण आडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि राजनाथसिंह यांची नावे घेतली. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना गडकरींनी राष्ट्रीय नेते संबोधले.
मोदींचे नाव घेतल्याने पत्रकारांनी गडकरींना विचारले तेव्हा मोदी राष्ट्रीय नेता असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
सध्या केशूभाई व मोदी यांच्या वादाबाबत गडकरी यांनी बोलण्याचे टाळले. गडकरी यांनी लिहलेल्या ब्लॉगबाबत त्यांनी बोलण्यास नकार देत ते मोठे नेते असल्याचे सांगितले.
आग्रा येथे झालेल्या दोन दिवसाच्या चिंतन बैठकीला महत्त्व आले आहे. यूपीमध्ये ८० लोकसभेच्या जागा आहेत. त्यातील फक्त ९ खासदार भाजपकडे आहेत.
\'गुप्त बैठकीत\' नितीशकुमारांनी घेतले आश्वासन, मोदी नसतील पंतप्रधानपदाचे उमेदवार