आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोकण, दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल, २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मान्सून केरळमध्ये काल दाखल झाल्यानंतर दुस-याच दिवशी तो तामिळनाडू, कर्नाटकसह महाराष्‍ट्रातही डेरेदाखल झाला आहे. हवामान खात्याने मान्‍सून आज महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार मान्सूनने दक्षिण महाराष्‍ट्र व कोकणात आगमन केले आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्याने कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधर पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
साधारणपणे एक जूनला केरळमध्ये दाखल होणा-या नैऋत्य मोसमी मान्सूनचे मंगळवारी चार दिवस उशिराने राज्यात आगमन झाले. दुसरीकडे देशाच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली. हवामानातील बदलामुळे दिल्लीत जोरदार पाऊस झाला. सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह पुणे व भोवतालच्या परिसरातही कालच रिमझिम झाली होती.
केरळात मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. तो वेगाने पुढे सरकण्याची चिन्हे आहेत, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यानुसार मान्सूनने २४ तासात तामिळनाडू, कर्नाटकसह महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. राष्ट्रीय जलवायू केंद्राचे संचालक आणि मान्सूनविषयी अंदाज व्यक्त करणारे मुख्य अधिकारी डी. शिवानंद पै यांनी सांगितले की, मान्सूनची स्थिती अत्यंत चांगली आहे. केरळ व दक्षिण कर्नाटकात आगामी दोन-तीन दिवसांत पाऊस पडेल. त्यानंतर ढग पुढे उत्तर भारताकडे सरकतील असे हवामान अनुकूल होईल.
उशीरा आलेल्या मान्सूनची वेगाने आगेकूच सुरू असून, पुढील चोवीस तासांत कोकण, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनची घोडदौड कायम राहिल्यास नेहमीच्या वेळापत्रकानुसार 10 जूनपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात पावसाळा सुरू होण्याचा अंदाज आहे.
पाऊस पडेलच असे नाही : गतवर्षी 3 जूनला मान्सून तळकोकणात आला होता. नंतर 5 जूनला त्याने महाराष्ट्र व्यापला. अर्थातच मान्सून पोहोचला म्हणजे सर्वत्र पाऊस पडतोच असे नाही. तथापि, हवेतील आर्द्रता, ढगांचे प्रमाण, वा-यांचा वेग, प्रदेशात पडणा-या पावसाची टक्केवारी, पावसाची व्याप्ती आदी निकषांवर मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान खात्याकडून जाहीर केले जाते.
48 तास पाऊस मान्सूनच
केरळ आणि लक्षद्वीपमध्ये 14 पर्यवेक्षण केंद्रे आहेत. यातील 7 केंद्रांनी मंगळवारी सुरू झालेला पाऊस 48 तास कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये सलग 48 तास पाऊस म्हणजे मान्सून आल्याची वर्दी असते, असे तज्ज्ञ म्हणतात.
या ठिकाणी होणार पाऊस
हवामान खात्यानुसार लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक किनारपट्टी, अंदमान-निकोबार बेटे, पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम व ईशान्येकडील राज्यांत जोरदार पावसाचा अंदाज. तामिळनाडू, मध्य कर्नाटक, आंध्र प्रदेश, कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्टÑ, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे.
मान्सूनचे महत्त्व काय
- देशात 60 टक्के शेतीत जून ते सप्टेंबर या काळातील पावसाच्या पाण्यावरच पिके घेतली जातात.
- जीडीपीत शेतीचा वाटा 15 टक्के आहे.
- भारतात 2011-12 या वर्षात 25.25 कोटी टन एवढे विक्रमी धान्य उत्पादन झाले होते.
- शेतीतून 60 टक्के लोकसंख्येला रोजगार
- शेती क्षेत्राचा विकास दर 3.5 टक्क्यांच्या वर जाऊ शकतो.
कोकणसह कोल्हापूर, सातार्‍यात बरसल्या पहिल्या पावसाच्या सरी
मे ‘हिट’मध्ये पावसाचा शिडकाव
वळवाचा पाऊस पुन्हा बरसणार; हवामान विभागाचा अंदाज