आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहा मोस्ट वाँटेड अतिरेक्यांचे सरकारकडे फोटो नाहीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पुणे बॉम्बस्फोटात पुन्हा एकदा इंडियन मुजाहिदीनचे नाव पुढे येत आहे. लष्कर-ए-तोयबासाठी मॉड्यूल शोधणे व त्यांच्यामार्फत दहशतवादी कारवाया घडवणा-या या संघटनेच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारकडून दबाव वाढत आहे, परंतु या संघटनेच्या दहा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची छायाचित्रेही सरकारकडे नाहीत.
संघटनेच्या भारतातील कारवायांचे सूत्रधार रियाझ व इक्बाल भटकळ या दोन भावांना शोधण्यातही सुरक्षा यंत्रणांना अपयश आले आहे. हे दोन्ही भाऊ पाकिस्तानात होते व त्यांच्यापैकी एक तेथून मध्य-पूर्व आशियातील एका देशात जाऊन लपल्याचे सांगितले जाते. देशातील दहशतवादी कारवायात सक्रिय असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या दहा दहशतवाद्यांची माहिती सरकारने गोळा केली आहे. यामध्ये कर्नाटक व केरळमधील चार तर झारखंडमधील दोन दहशतवाद्यांचा समावेश आहे. कर्नाटकातील चौघांमध्ये बेळगाव येथील आझम, भटकळ येथील जासीम व वासीम ऊर्फ यासीर भटकळ तसेच देवांगरेचा समीर सलीम खान या चार जणांचा समावेश आहे. केरळमधील चौघांमध्ये कन्नूर येथील मोहंमद अझहर, पी. पी. युसूफ, शफिक व रायसल पी. ए. या चौघांची माहिती संकलित करण्यात आली.
झारखंडची राजधानी रांची येथील दानिश व मंजर या दोन दहशतवाद्यांचाही यात समावेश आहे. मात्र, या पैकी एकाही दहशतवाद्याचे छायाचित्र सरकारकडे नाही. या सर्वांची छायाचित्रे व अधिक माहितीसाठी संबंधित राज्य सरकारांच्या मदतीने केंद्र सरकारी यंत्रणा कार्यरत आहेत.
महाराष्ट्र, गुजरातमधील छायाचित्रे उपलब्ध - केंद्र व राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच अन्य काही दहशतवाद्यांची छायाचित्रे मिळवण्यात आली आहेत. यामध्ये इंडियन मुजाहिदीनचा गुजरात राज्यातील प्रमुख दहशतवादी मुजीब तसेच अलमजेब आफ्रिदी, महाराष्ट्रातील अब्दुस सुभान उस्मान कुरैशी, अबू फजल तसेच मोहसीन चौधरी या दहशतवाद्यांची छायाचित्रे मिळवण्यात आली आहेत. गुजरात व महाराष्ट्रात दहशतवादी संघटनेचे नेटवर्क चालवणा-या या दहशतवाद्यांची छायाचित्रे मिळाल्यानंतर या दहशतवाद्यांवर दबाव वाढला.
भारताला हवे आहेत हे टॉप फाईव्ह मोस्ट वॉन्टेड दहशतवादी!
पुणे स्फोट : इंडियन मुजाहिद्दीन पोलिसांच्या रडारवर
पुणे स्‍फोटः अलर्ट मिळूनही पोलिस यंत्रणा गाफील!
का घडविला पुण्यात स्फोट?,कोणती आहेत कारणे व शक्यता...