आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MPs Walk Out Of Lok Sabha On Sri Lankan Tamils Issue

श्रीलंकेतील तामिळींच्या प्रश्नावर सरकारची बोटचेपी भूमिका!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - श्रीलंकेतील तामिळ नागरिकांवरील अत्याचाराचे संसदेत गुरुवारी तीव्र पडसाद उमटले. संयुक्त राष्ट्रात मानवी हक्क प्रस्तावावर भारताने श्रीलंकेविरुद्ध मतदान करण्याबाबत सरकारने अद्यापही ठोस भूमिका घेतली नसल्याने यूपीए घटक पक्ष द्रमुकसह अण्णा द्रमुक, भाजप आणि जदयूच्या खासदारांनी सभात्याग केला.

जिनेव्हातील संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेत श्रीलंकेतील तामिळ अत्याचाराविरुद्ध अमेरिकेने प्रस्ताव दाखल केला असून या प्रस्तावास पाठिंबा देण्यासाठी भारताने मतदान करावे असा आग्रह द्रमुकसह विविध राजकीय पक्षांनी केला आहे.मात्र तामिळ अत्याचारविरोधात स्वतंत्र चौकशी करण्याची इच्छा असल्याचे सांगून मतदानाबाबत ‘योग्य तो निर्णय’घेतला जाईल असे गोलमोल उत्तर देऊन परराष्ट्र मंत्री सलमान खुुर्शीद यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता.त्यावेळी सर्वच पक्षांच्या खासदारांनी ठोस भूमिका सांगा अशी आग्रही मागणी करून सभागृह दणाणून सोडले. भारत स्वतंत्र प्रस्ताव का दाखल करीत नाही अथवा अमेरिकेच्या प्रस्तावाला पाठिंबा का देत नाही अशी प्रश्नांची सरबत्तीच
खासदारांनी केली.

जगाचे पोलिस व्हायचे नाही - श्रीलंकन लष्कराने केलेल्या तामिळ अत्याचाराकडे सरकार डोळेझाक करीत असल्याचा आरोप तामिळ खासदारांनी केल्यानंतर भारताला जगाचे ‘पोलिस ’होण्याची इच्छा नाही अथवा एखाद्या देशाचा मोठा भाऊसुद्धा व्हायचे नाही असे सांगून खुर्शीद यांनी नाव न घेता अमेरिकेला टोला लगावला.