आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mulayam Asks Party Workers To Get Ready For Elections In 2013

२०१३ मध्ये पडणार केंद्र सरकार? - मुलायम सिंह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी आज आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पुढील लोकसभा निवडणुकीसाठी तयार राहा असे सांगितले आहे. कारण लोकसभा निवडणूक वेळेच्या आधी म्हणजे २०१३ मध्ये होऊ शकते. लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात पक्षाच्या मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत मुलायम सिंह यादव म्हणाले की, वर्तमान राजकारणातील घडामोडी पाहता २०१४ साली होणारी लोकसभेची निवडणूक लवकर होईल, या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
बैठकीला उपस्थित असलेल्या सपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितल्याप्रमाणे, पार्टी अध्यक्षांनी आम्हाला उत्तर प्रदेशातील ५० ठिकाणाहून लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचे लक्ष्य दिले आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणूक २०१३ मध्ये होण्याची शक्यता आहे, असेही सांगितले आहे. त्यांनी असेही सांगितले आहे की, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या सरकारने १०० दिवसात जी कामे केली आहेत, त्या कामांची माहिती आपापल्या वार्डातील नेत्यांनी जनतेला द्यावी.
सपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काम सुरु केले असून ५८ लोकसभेच्या जागांसाठी तेवढेच पर्यवेक्षक नेमणार असल्याचे ठरवले आहे.
‘मध्यावधी’साठी सज्ज राहा : मुलायम