आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mulayam Mayawati Attend Sonias Lunch But Where Are Sharad Pawar And Praful Patel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युपीएचा लंच :सोनियांसोबत मायावती पीएमसोबत बसले मुलायम, पवारांची अनुपस्थिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक मंगळवारी होणार आहे. त्याआधी आज युपीएने लंचचे आयोजन केले होते. यावेळी उत्तर प्रदेशचे दोन दिग्गज नेते मुलायम सिंह यादव आणि मायावती उपस्थित होत्या. मात्र, युपीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची अनुपस्थिती युपीएसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
लंचच्या वेळी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे सुप्रिमो मुलायम सिंह यादव यांना व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्या जात होती. मायावती यांना सोनिया गांधी यांच्या टेबलवर स्थान देण्यात आले होते. त्यांच्या जवळच्याच टेबलवर पंतप्रधान मनमोहनसिंग आणि मुलायमसिंह यादव एकत्र बसलेले होते. युपीएसाठी समाधानाची बाब म्हणजे तृणमुल काँग्रेसच्या काही खासदारांनी लंचला हजेरी लावली होती.
युपीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार हमीद अन्सारी आहेत. त्यांच्याबाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा यासाठी युपीएकडून प्रयत्न सुरु आहेत. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, मायावती यांना अधिक महत्त्व दिले जाण्यामागे समाजवादी पक्षाला अप्रत्यक्ष इशारा आहे की त्यांनी केंद्र सरकारला महत्त्वाच्या मुद्यांवर समर्थन द्यावे, अन्यथा युपीएकडे दुसरा पर्यायदेखील उपलब्ध आहे. किरकोळ बाजारात परकीय गुंतवणूकीची मुदत वाढविण्याविरोधात समाजवादी पक्षाने डाव्या पक्षांना समर्थन देत पंतप्रधानांना पत्र लिहून विरोध दर्शवला होता.
दरम्यान, भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जसवंत सिंह यांना मोठा झटका बसला आहे. बिजू जनता दलाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला आहे. बीजेडीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत एनडीएचे उमेदवार पी.ए.संगमा यांना पाठिंबा दिला होता.
उपराष्ट्रपती निवडणूक: जसवंतसिंग विरुद्ध हमीद अन्सारी लढत
शरद पवारांचे ज्ञान व अनुभव सरकारसाठी महत्त्वाचा- पंतप्रधान
ANALYSIS : शरद पवारांची नाराजी योग्य की अयोग्य?