आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायम यांचा पुत्र अखिलेश ला घरचा आहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री,खासदार, आमदार योग्य प्रकारे काम करत नाहीत. त्यांनी आतापर्यंत पक्षाचे घोषणापत्र देखील वाचलेले नाही. राजकीय पक्षांसाठी घोषणापत्र हे गीता - कुराणासारखेच पवित्र असते, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आपले पुत्र मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या
सरकारला घरचा आहेर दिला.

समाजवादी पार्टीतर्फे येथे आयोजित पंचायतीमध्ये मुलायम यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षाचे मंत्री, पदाधिका-या ना खडे बोल सुनावले. सरकारच्या कामावर जाहीररीत्या नाराजी प्रकट करताना काहीतरी असे करा की जनतेला कल्याणकारी योजनांचे थेट लाभ त्यांना मिळू शकतील. भ्रष्टाचार ही संस्कृती बनत असल्याची टीका त्यांनी केली, परंतु भ्रष्टाचारावर जाहीरपणे बोलले जात असून त्यातून काहीतरी सकारात्मक परिणाम दिसतील, असे ते म्हणाले.