आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mulayam Singh Not Happy With Akhilesh Yadav Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘भैयाजी’च्या सरकारवर ‘नेताजीं’ नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्तरप्रदेशात ‘भैयाजी’ उर्फ अखिलेश यादव यांच्या सरकारवर समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह अर्थात ‘नेताजी’ नाराज आहेत. मंगळवारी तर मुलायम सिंहांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, सरकारच्या मंत्र्यांनी आपल्या कामकाजात सुधारणा करावी, अन्यथा नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागतील.
ते पुढे म्हणाले की, चार महिन्यांच्या कारकीर्दीत बदल घडवून आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे. समाजवादी पार्टीच्या विधीमंडळ बैठकीत मुलायम सिंह बोलत होते. यादव म्हणाले की, सपा कार्यकर्त्यांनी पाच वर्षे बसपा राजवटीविरुद्ध संघर्ष केला. मात्र अखिलेश सरकारकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. अनेक आव्हानांना तोंड देत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय नाही.
ही बैठक अखिलेश यादवांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री निवासस्थानावर घेण्यात आली. यावेळी मुलायम सिंह म्हणाले की, आमदार आणि मंत्र्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकांकडे लक्ष ठेवावे. या निवडणुकांमध्ये केंद्रात सपाला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे केंद्रात समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याशिवाय कोणत्याही आघाडीला सरकार स्थापन करणे अशक्य ठरणार आहे.