आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायम सिंग काढणार यूपीएचा पाठिंबा? अर्थसंकल्‍पानंतर देणार \'दे धक्‍का\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कॉंग्रेस नेतृत्‍वाखालील संयुक्‍त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारला समाजवादी पक्षाकडून धक्‍का बसण्‍याची शक्‍यता आहे. एका वाहिनीने दिलेल्‍या वृत्तानुसार समाजवादी पक्ष सरकारचे समर्थन काढण्‍याचा विचार करीत असल्‍याचे समजते. सपा सुप्रीमो मुलायम सिंग यावर्षी लोकसभा निवडणूक घेण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहेत.

आगामी अर्थसंकल्‍पानंतर कधीही निवडणुका होऊ शकतात. त्‍यामुळे कार्यकर्त्‍यांनी तयारीला लागले पाहिजे, असे मुलायम सिंग यांनी म्‍हटले. यापूर्वीही मुलायम यांनी सरकारचा पाठिंबा काढण्‍याची धमकी दिली होती. जर एससी/एसटी आरक्षण विधेयक संमत झाले तर सपा पाठिंबा काढेल असे म्‍हटले होते.

समाजवादी पक्ष युपीएला बाहेरून पाठिंबा देत आहे. तृणमूल कॉंग्रेसने पाठिंबा काढल्‍यानंतर युपीएकडे लोकसभेमध्‍ये फक्‍त 250 खासदार आहेत. सपाचे 21 खासदार सरकारला बाहेरून पाठिंबा देत आहेत. बहुजन समाज पक्षाचे 22 खासदारही युपीएला बाहेरून पाठिंबा देत आहेत. दरम्‍यान सपानेते राम कुशवाहा यांनी पंतप्रधानसाठी मुलायम सिंग यांचे नाव पुढे केले आहे.