आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Murder Offense Registered Against Raja Bhaiyya By Cbi

डीएसपी हत्‍येप्रकरणी राजा भय्याविरोधात सीबीआयकडून खुनाचा गुन्‍हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- अखिलेश यादव यांच्‍या मंत्रिमंडळातील माजी मंत्री राजा भय्या यांच्‍या अडचणी वाढण्‍याची शक्‍यता आहे. सीबीआयने पोलिस उपअधीक्षक झिया उल हक यांच्‍या हत्‍येप्रकरणी राजा भय्या यांच्‍याविरोधात खुनाचा गुन्‍हा नोंदविला आहे. याशिवाय इतर 6 कलमेही त्‍यांच्‍याविरुद्ध लावण्‍यात आली आहे. सीबीआयतर्फे सर्वप्रथम प्राथमिक पुरावे गोळा करण्‍यात येतील. त्‍यानंतर त्‍यांना अटक होईल. सीबीआयचे अधिकारी शुक्रवारी त्‍यांची चौकशी करणार आहेत.

प्रतापगढमध्‍ये कुंडा गावात हक यांची हत्‍या करण्‍यात आली होती. याप्रकरणी 4 तक्रारी नोंदविण्‍यात आल्‍या आहेत. याप्रकरणी सीबीआयने तपासाची गती वाढविली आहे. सीबीआयचे एक पथक कुंडा गावात दाखल झाले आहे. गरज भासल्‍यास हक यांचे पुन्‍हा शवविच्‍छेदन करण्‍यात येईल.