आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बायकोला पळवून नेणा-या प्रियकराच्‍या भावास जिवंत जाळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिहोर- युवकाच्‍या प्रेमप्रकरणामुळे त्‍याच्‍या मोठया भावाचे अपहरण करून जाळण्‍यात आल्‍याचे प्रकरण उजेडात आले आहे. जाळण्‍यात आलेल्‍या युवकाचे नाव अमर सिंह (35) असून त्‍याला जीपमध्‍ये बसवून नेण्‍यात आले. त्‍याला मारहाण करून जाळण्‍यात आले. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपी आणि जीप मालकाविरूद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तिलाडिया येथील बलवंत सिंह आणि 8-10 लोकांनी मिळून हा प्रकार केला. नसरूल्‍लागंजमधील झांगर येथील अमर सिंहला आरोपींनी शनिवारी दुपारी एकच्‍या दरम्‍यान जीपमध्‍ये बळजबरीने बसवले.
आरोपींनी त्‍याला तिलाडियापासून अडीच किलोमीटर दूर असलेल्‍या एका शेतात नेण्‍यात आले आणि खड्यात ढकलून त्‍याच्‍यावर पेट्रोल टाकून पेटवण्‍यात आले. पोलिसांनी घटनास्‍थळी पोहोचून अर्धवट जळालेल्‍या मृतदेहाचा पंचनामा केला. तसेच यासाठी वापरलेली जीपही जप्‍त केली.
काय होते प्रकरण
गेल्‍या 26 एप्रिल रोजी तिलाडिया येथील बलवंत सिंहची पत्‍नी हेमा राजपूतला झागरमधील अमर सिंह याचा लहान भाऊ सवर सिंहने पळवून नेले होते. हरवल्‍याची तक्रार नोंदवल्‍यानंतर पोलिसांनी हेमा आणि सवर सिंह यांना शोधून नसरूल्‍लागंज येथे आणले होते. त्‍यावेळी न्‍यायालयात हेमाने स्‍वखुशीने सवर सिंहबरोबर राहणार असल्‍याचे सांगितले आणि ती त्‍याच्‍याबरोबर राहू लागली होती. तेव्‍हापासूनच हेमाचा पती बलवंत आणि त्‍याच्‍या कुटुंबियांनी सवर सिंहला मारण्‍याचे नियोजन सुरू केले होते.
विधवेवर बलात्‍कार करून बनवला एमएमएस
शिक्षकाने मित्रांच्‍या मदतीने विद्यार्थिनीवर केला सामुहिक बलात्‍कार