आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Musharaf Courgeous : Retired General Chife V K Singh Admiring

...तर जनरल परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ यांच्या कारगिल आक्रमणाच्या दु:साहसाबद्दल पाकिस्तानात टीकेचे झोड उठली असताना भारताचे निवृत्त लष्करप्रमुखांनी मात्र त्यांच्या साहसाची स्तुती केली आहे. मुशर्रफ हे धाडसी होते अशा शब्दात निवृत्त जनरल व्ही. के. सिंह यांनी त्यंची प्रशंसा केली. सन 1999 मध्ये ताबा रेषेवर मुशर्रफ यांनी एखाद्या कमांडरला शोभेल असे धआडस दाखवले आहे. जनरल सिंह 2010 ते 2012 या काळात लष्करप्रमुख होते. ‘पाकिस्तानी फौजांना हद्दीत घुसखोरी करता आली ही भारतीय लष्कराचीच चूक होती. भारतीय फौजांनीच पाकिस्तानी घुसखोरांना संधी दिली. असा उलट आरोप जनरल सिंग यांनी केला.

आयएसआयचे माजी संचालक व निवृत्त जनरल जियाउद्दीन बट्ट यांनी मुशर्रफ यांचा भांडाफोड़ करीत खळबळजनक आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणांची सविस्तर चौकशी केली तर, मुशर्रफ यांना फाशीची शिक्षाही होऊ शकते, असे बट्ट यांनी म्हटले आहे.