आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारगिलवेळी मुशर्रफ यांनी भारतीय हद्दीत 11 किमीपर्यंत केली होती घुसखोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कारगील युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी काश्मीर सीमा (एलओसी) पार करुन भारतीय हद्दीत प्रवेश केला होता, असा गौप्यस्फोट आयएसआयच्या जनसंपर्क विभागाचे माजी संचालक अशफाक हुसैन यांनी केला आहे.

हुसैन यांनी आपल्या विटनेस टू ब्लंडर या पुस्तकात वरील खुलासा केला आहे. तत्कालीन लष्करप्रमुख व पुढे देशाचे राष्ट्राध्यक्ष झालेले मुशर्रफ यांनी एलओसीची हद्द ओलांडून भारतीय हद्दीत सुमारे 11 किलोमीटर इतकी आत घुसखोरी केली होती, असेही हुसैन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुस्तकात हुसैन यांनी लिहले आहे की, 18 डिसेंबर 1998 मध्ये पहिल्यांदा कॅप्टन नदीम, कॅप्टन अली आणि हवालदार ललक जान यांनी एलओसी वरुन रेकी केली होती. त्यानंतर 28 मार्च 1999 ला जनरल परवेज मुशर्रफ हेलिकॉप्टरमधून एलओसीची सीमा सोडून भारतीय हद्दीत 11 किलोमीटरपर्यंत आत गेले होते. तेथे त्यांनी संपूर्ण काढली. त्यांच्यासोबत कर्नल अमजद शब्बीर होते. मुशर्रफ जेथे थांबले होते त्या ठिकाणाला पुस्तकात ‘जकरिया मुस्तकर’ म्हटले गेले आहे. हे पुस्तक 2008 मध्ये प्रकाशित झाले होते.