आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीतकार अँथनी गोन्सालविस यांचे गोव्यात निधन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - ज्येष्ठ संगीतकार अँथनी गोन्सालविस यांचे बुधवारी निधन झाले. 1977 मध्ये अमिताभ बच्चन यांनी अमर-अकबर-अँथनी चित्रपटांत साकारलेल्या भूमिकेचे नाव अँथनी यांच्या नावावरूनच ठेवण्यात आले होते. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले ‘माय नेम इज अँथनी गोल्सालविज’ हे गीतही त्या काळात प्रचंड गाजले होते.
दक्षिण गोव्यात जन्मलेले गोल्सालविस भारतीय संगीताबरोबरच पाश्चिमात्य संगीतातही निपूण होते. अमिताभ बच्चन यांनी गोल्सालविस यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
त्यांनी 1943 मध्ये कारकीर्द सुरू केली. गुलाम हैदर, शाम सुंदर, नौशाद, सचिनदेव बर्मन या नामांकित संगीतकारांसोबत त्यांनी काम केले. 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाने पुरस्कार मिळवला होता.