आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Myter Hemaraj Singh's Village Change Over The Night

शहीद हेमराज सिंगच्या गावाचे चित्र एका रात्रीतून पालटले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खैरऐर (यूपी) - पाकिस्तानने शिरच्छेद केलेल्या भारतीय सैनिकाच्या मूळ गावाचे रुपडे एका रात्रीतून पालटून गेले आहे. पायाभूत सुविधेच्या अभावात जगणा-या गावात रस्ते, वीज आणि हेलिपॅडची सुविधा रविवारी झटक्यात झाली आहे. हाय प्रोफाइल लोक, आमदार, मंत्र्यांचे येणे-जाणे वाढले आहे. एकूणच शेरनगरचा चेहरामोहरा बदलल्याचे दिसू लागले आहे.

हेमराजच्या कुुटुंबीयांना भेटण्यासाठी राजकीय मंडळींची गर्दी गावात होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, भाजपचे नेते नितीन गडकरी, सुषमा स्वराज यासारख्या हायप्रोफाइल नेते मंडळींनी गावाला भेट दिली आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी गावात रस्ते तयार झाले आहेत. विजेसाठी नवीन ट्रान्सफार्मर बसवण्यात आला आहे. ही कामे तातडीने सुरू झाली आहेत. मंत्र्यांना थेट गावात हेलिकॉप्टरने येण्याची सुविधादेखील या छोट्याशा गावात झाली आहे. येथे हेलिपॅडदेखील तयार करण्यात आले आहे, असे द्रुपाल सिंग यांनी सांगितले. द्रुपाल हे हेमराजच्या पत्नीचे काका आहेत. गावात नेहमीच अंधार असतो. परंतु आता अचानक वीज आल्याने गावक-यांना सुखद धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानकडून शिरच्छेद झालेल्या हेमराजला निर्मला (7), प्रिन्स (5), कल्लो (3) अशी मुले आहेत.

शेवटच्या भेटीवेळी अंधार
हेमराजने गावाला शेवटची भेट दिली होती त्या वेळी गाव नेहमीसारखाच अंधारात बुडालेला होता. त्या वेळी हेमराजने लष्करी आणि काही खासगी वाहनांच्या साहाय्याने गावात प्रकाश केल्याची आठवण गावक-या ंनी सांगितली. गावात साधी शाळादेखील नाही. येथील मुलांना शेजारी असलेल्या छत्ता नावाच्या गावातील शाळेत जावे लागते. पायी किंवा सायकल एवढेच त्यांच्यासाठी दळणवळणाचे माध्यम आहे.

भाऊ शेतकरी : हेमराजचे गाव यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. येथील गावक-यांचा उदरनिर्वाह बहुतांश शेतीवरच आहे. शेती अत्यंत कसदार आहे. हेमराजचे भाऊ पूरन आणि जयसिंगदेखील शेतकरी आहेत.
आम्हाला हेमराजचा अभिमान आहे. आता आम्ही प्रिन्सला लष्करातच पाठवणार आहोत. तो त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा सूड पाकिस्तानच्या लष्कराकडून घेईल. - मीना, हेमराजची आई, धर्मवती (पत्नी)
विकासासाठी लष्कर
हेमराज भय्याने देशासाठी बलिदान दिले. आता प्रत्येकजण त्यांच्याविषयी बोलत आहे. मीडियातील लोक, राजकारणी, उच्च्पदस्थ पोलिस, प्रशासनातील अधिका-या ंची गावात गर्दी होत आहे. हेमराजच्या मृत्यूपूर्वी गावात चांगला रस्ता, वीज अशी काही सुविधा नव्हती. त्यामुळे गावाचा विकास करण्यासाठी लष्करात जाणे योग्य आहे, अशी भावना गावातील मुलांनी व्यक्त केली आहे. चांगले आयुष्य हवे असेल तर लष्करात जायला हवे, असे मत 14 वर्षीय राजवीर नावाच्या शाळकरी मुलाने व्यक्त केले.