आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nagaland Home Minister Detained After Cash And Weapons Found In His Car

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सव्‍वा कोटींची रोकड व शस्‍त्रास्‍त्रांसह नागालँडच्‍या गृहमंत्र्यांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोहिमा- नागालँडचे गृहमंत्री इमकॉंग एल. इम्‍चेन यांच्‍या कारमध्ये बंदूक, शस्त्रास्त्रे आणि एक कोटीची रोख रक्कम सापडल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. इमकाँग यांना पोलिसांनी वोका जिल्ह्यातून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागालँडमध्‍ये 22 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूक होणार असून निवडणुकीमध्‍ये पैशांचा पाऊस पडताना दिसत आहे.

प्राप्त महितीनुसार, इम्चेन हे कोहिमा येथून कोरीडंगामधील मोकोक्चुंग या आपल्या मतदारसंघात जात असताना आसाम रायफल्सच्या जवानांनी त्यांच्या गाडीची तपासणी केली. त्‍यावेळी गाडीत 1 कोटी 20 लाख रुपये रोख तसेच पाच पिस्तूल आणि दोन रायफल सापडले. याशिवाय जिवंत काडतुसे आणि मद्यसाठीही गाडीत होता. त्यानंतर आसाम रायफल्सच्या जवानांनी इम्चेन यांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा प्रशासन अधिकारी व पोलिसांच्या ताब्यात दिले.

इम्चेन हे कोरीडंगा येथील नागालँड पीपल्स फ्रंटचे (एनपीएफ) नेते आहेत. तसेच ते मोकोकचुंग जिल्ह्याचे पक्षप्रमुख आहेत. निवडणूक आयोगाने 16 फेब्रुवारीला एनपीएफच्या नेत्यांकडून कोट्यावधी रुपये जप्त केले होते. पिपल्स फ्रंटचा उमेदवार निमेली फोम यांच्या हेलिकॉप्टरमध्ये एक कोटीची कॅश आढळल्याने खळबळ उडाली होती. ते प्रकरण ताजे असताना थेट राज्याचे गृहमंत्रीच जाळ्यात सापडले आहेत.

(फोटोः नागालँडच्‍या गृहमंत्र्यांच्‍या गाडीतून जप्‍त करण्‍यात आलेली रोख रक्‍कम तसेच शस्‍त्रास्‍त्रे.)