आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nail Found In Breakfast Served In Shatabdi Express

रेल्‍वेची \'अनुभूती\'- शताब्‍दी एक्‍स्‍प्रेसच्‍या ब्रेकफास्‍टमध्‍ये निघाला खिळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर- रेल्‍वे प्रवाशांना सुविधा देणे तसेच खाद्य पदार्थांचा दर्जा सुधारण्‍याचे रेल्‍वेमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन फोल ठरले आहे. शताब्‍दी एक्‍स्‍प्रेससारख्‍या अतिविशेष गाडीत एका प्रवाशाने घेतलेल्‍या ब्रेकफास्‍टमध्‍ये चक्‍क खिळा निघाला. खिळा असल्‍याचे लक्षात न आल्‍यामुळे प्रवाशाच्‍या तोंडात जखम झाली आणि रक्‍तही वाहू लागले. परंतु, यापुढे अनुभव आला तो रेल्‍वे कर्मचा-यांच्‍या उद्धटपणाचा. या प्रवाशाने तक्रार केली असता गाडीतील कर्मचा-यांनी त्‍याचे म्‍हणणे ऐकूनच घेतले नाही. अखेर इतर प्रवाशांनी गोंधळ केल्‍यानंतर कोच अटेंडंटने तक्रार नोंदवून घेतली.

प्राप्‍त माहितीनुसार, कानपूर येथील सुपर टेनरीचे सहसंचालक मुबासिरुल अमीन सहपरिवार शताब्‍दी एक्‍स्‍प्रेसच्‍या एक्झिक्‍युटीव्‍ह कोचमधून दिल्‍लीला जात होते. सकाळी 9 वाजता त्‍यांना ब्रेडऑमलेट नाश्‍टा म्‍हणून देण्‍यात आले. ते खाल्‍यावर अमीन यांच्‍या तोंडात काहीतरी जोरात रुतले. रुतलेली वस्‍तू होती खिळा! हे पाहून ते चक्रावले. त्‍यांच्‍या तोंडातून रक्त येत होते. नाश्‍टा देणा-याकडे याबाबत तक्रार केली तर त्‍याने चूक मान्‍य न करता तसाच निघून गेला. त्‍यामुळे इतर प्रवाशांनी गोंधळ घातला. अखेर कोच अटेंडंट तिथे पोहोचले. त्‍यांनी तक्रार पुस्तिकेमध्‍ये तक्रार नोंदवून प्रवाशांना शांत केले. हाच प्रकार युरोप किंवा अमेरिकेत घडला असता तर लाखो रुपयांचा दावा ठोकता आला असता.

अशाच शताब्‍दी आणि राजधानी एक्‍स्‍प्रेसमध्‍ये रेल्‍वेमंत्री पवन बंसल यांनी अधिक आरामदायी सुविधा असलेले 'अनुभूती' श्रेणीचे डबे जोडण्‍याची घोषणा केली होती. परंतु, याच गाडीत अन्‍नातून खिळा निघण्‍याचा प्रकार घडतो आणि रेल्‍वेकडून त्‍याची दखलही घेण्‍यासाठी गोंधळ घालावा लागतो. त्‍यावरुन प्रवाशांना कोणती 'अनुभूती' मिळणार, हे स्‍पष्‍ट झाले आहे.