आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानपदाची उमेदवारी? मोदी आहेत 'निर्विकार'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी राष्‍ट्रीय राजकारणात येण्‍यासंदर्भात सुरु असलेल्‍या चर्चेबाबत सर्वांना संभ्रमात टाकत आहेत. प्रत्‍येक कृतीमागे राष्‍ट्रीय हेतू असतो, असे एकीकडे सांगणारे नरेंद्र मोदी आता राष्‍ट्रीय व्‍यासपीठावर येण्‍याबाबत 'निर्विकार' असल्‍याचे सांगतात.
भारतीय जनता पार्टीचे अध्‍यक्ष नितीन गडकरी यांनी मोदींना पंतप्रधानपदाच्‍या 6 दावेदारांपैकी एक म्‍हटले होते. यावर नरेंद्र मोदींनी प्रतिक्रीया देताना आपण 'निर्विकार' असल्‍याचे सांगितले. ते म्‍हणाले, राज्‍यातील 6 कोटी जनतेच्‍या विकासावर माझे संपूर्ण लक्ष केंद्रीत आहे. राष्‍ट्रीय राजकारणाबाबतच्‍या चर्चेला त्‍यांनी प्राणायामसोबत जोडले. ते म्‍हणाले, नियमित योग करणारे, विशेषतः प्राणायाम करणा-यांना आजुबाजूच्‍या आवाजाची जाणिव राहत नाही. उजेड किंवा अंधार असो, त्‍यांच्‍यावर काहीही फरक पडत नाही. ते निर्विकार असतात. अशाच प्रकारे या चर्चांबाबत मी निर्विकार आहे.
गडकरी यांनी शुक्रवारी म्‍हटले होते की, अडवाणी, मोदी, राजनाथ‍ सिंह, सुषमा स्‍वराज, अरुण जेटली आणि मुरली मनोहर जोशी हे पंतप्रधानपदाच्‍या उमेदवारीसाठी शर्यतीत आहेत. यासंदर्भात पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
काँग्रेसशी हातमिळवणी करु शकतात नितीशकुमार, मोदींचा केंद्रावर हल्ला
\'नरेंद्र मोदी २०१४ ला नसतील एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार\'
मोदी मोठे नेते असल्यामुळे जोशी प्रकरणात पक्षाची माघार - गडकरी