आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्‍याचे मुस्लिम संघटनांचे आव्‍हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- लखनौ किंवा फैजाबादमधून गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्‍हान उत्तर प्रदेश येथील ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दिले आहे. मोदी हे फक्‍त गुजरातमध्‍येच प्रसिद्ध असल्‍याचे बोर्डातील काही सदस्‍यांचे मत आहे. त्‍यांना अजून दुस-या राज्‍यातही आपली पात्रता दाखवून द्यावी लागेल.

तर दुसरीकडे साधू संतांचा एक गट मोदींविरूद्ध उभा राहिला आहे. महाकुंभमध्‍ये मध्‍ये स्‍वामी अधोक्षजानंद यांनी राजकारणाला धर्मापासून दूर ठेवले पाहिजे असे म्‍हटले. कुंभमेळयात सर्व धर्माचे लोक येतात. अशावेळी राजकारण करण्‍यात येऊ नये. जे लोक मोदींना येथे बोलवत आहेत. ते ढोंगी संत आहेत, असे ते म्‍हणाले. याच्‍यापुढेही ते म्‍हणाले, 'नरेंद्र मोदींनी गुजरात नरसंहारसाठी माफी मागितली पाहिजे. ते जोपर्यंत यासाठी शिक्षा भोगत नाहीत. तोपर्यंत धर्म मंडपात त्‍यांचे कोणी स्‍वागत नाही करणार.'


कुंभमेळयात सहा आणि सात फेब्रुवारीला होणा-या संत संमेलनात भाजपचे अनेक ज्‍येष्‍ठ नेते सहभागी होणार आहेत. यामध्‍ये नरेंद्र मोदींच्‍या नावाचाही समावेश आहे.