आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेनका गांधी व शत्रुघ्न सिन्हांकडून राजनाथ सिंगांच्या आदेशाला हरताळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी सोमवारी आपल्या पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना दम भरत, यापुढे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन जर कोणी काही वक्तव्ये व फालतू चर्चा केली तर त्यांची काही खैर नाही, अशा शब्दात सुनावले आहे. दरम्यान, राजनाथ यांनी असे सांगून चार तास होत नाहीत तोवरच खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि मेनका गांधी यांच्या त्यांच्या आदेशाला हरताळ फासत मोदींसाठी बँटिंग केली आहे.

राजनाथ यांनी मीडियाच्या माध्यमाद्वारे सांगितले की, मी याआधीही सांगितले आहे आणि आताही सांगतो आहे की, पंतप्रधानपदाच्या बाबतीत कोणत्याही नेत्याने व पदाधिका-याने काहीही वक्तव्य करु नये. भारतीय जनता पक्षात परंपरा आहे की, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय पक्षाची संसदीय समिती करते. जर तुम्हाला पत्रकारांनी व इतरांनी याबाबत विचारणा केली तर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय़ संसदीय बोर्डाच्या बैठकीत घेतला जाईल, असे उत्तर द्यावे. आपापली मते जरी वैयक्तिक असली तरी त्यातून एक वेगळा संदेश जातो व त्याचा पक्षाला व एक पक्षाध्यक्ष म्हणून मलाही त्रास होतो. तसेच याबाबत मी पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करतो की, यापुढे पंतप्रधानपदावरुन कोणीही काहीही वक्तव्य करु नये, तसेच यापुढे बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही.

दरम्यान, रविवारी माध्यमांनी मोदींच्या पंतप्रधानबाबात राजनाथ सिंग यांना विचारले असता, मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असून एक सक्षम आणि लोकप्रिय नेता असल्याचे म्हटले होते. मात्र, पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची निवड संसदीय बोर्डाच्या बैठकीत होईल. राजनाथ सिंग पुढे म्हणाले, २००९च्या लोकसभा निवडणुकीत लालकृष्ण आडवाणी यांची निवड संसदीय बोर्डाने केली होती. यंदाही तसेच होईल. तसेच अलाहाबादमधील कुंभमेळ्यात होणा-या संघ परिवाराच्या बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार निवडण्याचा निर्णय होणार असल्याचे त्यांनी फेटाळून लावले. आम्ही कुंभ मेळ्यात जातो. आताही जाणार आहे.

मेनका, शत्रुघ्न यांचा अध्यक्षांच्या आदेशाला फाटा- पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन कोणतेही वक्तव्य करु नका, असा आदेश दोऊन चार तास होत नाहीत तोवर मेनका गांधी व शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्याच आदेशाला हारताळ फासला आहे. मोदी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, मेनका यांनी मोदींसह पाच-सहा नेते पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याचे वक्तव्य केले.