आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक लग्ने व मुले जन्माला घालण्यास मुस्लिमांना आळा घाला- अशोक सिंघल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अलाहाबादमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमध्ये राजकारणाने शिरकाव केला आहे. विश्‍व‍ हिंदू परिषदशी संबंधित साधू-संतांची बैठक फेब्रुवारीत होणार आहे. यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याच्या मागणीचा ठराव मंजूर केला जाणार आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर संतांचे मंडळ भाजपवर मोदींच्या नावाबाबत दबाव वाढवणार आहे. भाजपच्या या महिन्यात होणा-या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यापूर्वी संतांनी आपला ठराव मंजूर करुन भाजपवर दबाव वाढविण्याचा प्रय़त्न केला आहे.

विश्व हिंदू परिषद (विहिंप) चे प्रमुख अशोक सिंघल यांनी 7 फेब्रुवारीला होऊ घातलेल्या बैठकीला 'इतिहास बदलवणारी घटना' असे म्हटले आहे. श्रीराम जन्मभूमीचा मुद्दा आता न्यायालयीन प्रक्रियेवर न सोडता त्याबाबत संसदेत लवकरात लवकर निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे सिंघल म्हणाले. ते पुढे म्हणाले, भाजपने याबाबत खुली भूमिका घेण्याची गरज आहे. तसेच हिंदुंची लोकसंख्या सतत घटत चालली आहे. भारतात 2061 पर्यंत हिंदू अल्‍पसंख्‍याक होऊ शकतात. अशावेळी मुस्लिम समाजातील एकापेक्षा जास्त लग्ने व दोनपेक्षा जास्त मुले पैदा करणे याला कायद्याने बंधन घालायला हवे.

श्रीरामाला कपड्याच्या मंदिरात मुक्त करुन त्यांचे गौरवशाली असे 70 एकर परिसरात भव्य व विशाल मंदिर बांधावे. तसेच तीर्थराज प्रयाग (अलाहाबाद)मध्ये सुरु असलेला महाकुंभ खूप महत्वपूर्ण आहे. ज्याद्वारे संत ज्वलंत विषयांबाबत विचारविनियम करुन निर्णय घेऊ शकतात. आता राम मंदिर बनवायचेच असून, राम मंदिराच्या जागेवर प्रतिष्ठा करण्यात येईल. राम मंदिर बांधण्यासाठी कुंभमेळ्यातील साधू-संतांनी महाजागरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले.

सिंघल यांच्या वक्तव्यावर काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी सडकून टीका केली आहे. सिंग म्हणाले, हिंदुत्‍वाचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. तसेच सिंघल, शाहनवाज हुसैन, मुख्‍तार अब्‍बास नक्वी, लालकृष्‍ण आडवाणी, नरेंद्र मोदी यांना आव्हान देतो की त्यांनी देशाला हिंदुत्‍वाचा अर्थ समजून सांगावा. हिंदुत्‍व आणि राम मंदिराच्या मुद्यांवर भाजप देशातील जनतेला कायम धोका देत आले आहे. भाजप जेव्हा सत्‍तेत येते तेव्हा श्रीरामाला विसरुन जाते व निवडणूक आली की पुन्हा रामाला आठवते.