आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Getting Strong Support From BJP Leaders

संत नाही तर हाफिज सईद पंतप्रधान ठरविणार का? भाजपचे जदयूला प्रत्‍युत्तर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पंतप्रधानपदाच्‍या उमेदवारीवरुन एनडीएमध्‍ये फुट पडताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि जद(यु) या दोन प्रमुख पक्षांमध्‍ये नरेंद्र मोदींवरुन दरी वाढत आहे. नरेंद्र मोदींच्‍या उमेदवारीसाठी कट्टर हिंदुत्त्ववादी नेते प्रयत्‍न करीत असून साधु-संतही मोदींना समर्थन देण्‍याची शक्‍यता आहे. पंतप्रधानपदाची उमेदवारी साधुसंतांनी ठरवली तर बिघडले कुठे?, असे उत्तर भाजपने जदयूला दिले आहे. यावरुन मोदींच्‍या उमेदवारीला भाजपमध्‍ये पाठिंबा वाढत असल्‍याचेही दिसून येत आहे.

जदयूने काल साधू संत आता देशाचा पंतप्रधान निवडणार का?, असा सवाल केला होता. त्‍यावर भाजपने प्रत्‍युत्तर दिले. भाजपचे प्रवक्ते मुख्‍तार अब्‍बास नक्वी यांनी सांगितले, संत समुदायाने देशाचा पंतप्रधान ठरविला तर त्‍यात गैर काय आहे. ते नाही ठरविणार तर काय हाफिज सईद ठरवेल?

पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या वादात योगगुरू बाबा रामदेव यांनीही उडी घेतली आहे. त्‍यांनी मोदींच्‍या उमेदवारीला एक प्रकारे समर्थन दिले आहे. तर भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी जदयू एनडीएतून बाहेर पडत असेल तरी हरकत नाही असे स्पष्ट म्हटले आहे.

देशातील अनेक पक्ष मुल्ला-मौलवी, इमामांच्या आदेशाने चालतात. मग साधू-संतांचे घेतले तर काय हरकत आहे ?, असे बलवीर पुंज म्हणाले. तसेच, मोदी परदेशातून आले आहेत काय, असा सवाल सी. पी. ठाकूर यांनी केला. यामुळे दोन्‍ही पक्षांमध्‍ये वाद वाढत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. यावर जदयूकडून काय प्रतिक्रीया येते, यावर लक्ष लागले आहे. दरम्‍यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. एका हिंदी दैनिकाने घेतलेल्या मुलाखतीत नितीश कुमार यांनी ही मागणी केली आहे.