आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Is First Choice For Prime Minister

सर्वेक्षणः राहुल गांधींऐवजी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पसंती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशात राजकीय वातावरण अस्थिर आहे. अशातच मुदतपूर्व लोकसभा निवडणूक झाल्‍यास कोणाला कौल मिळेल? एका सर्वेक्षणानुसार जनता भाजपच्‍या नेतृत्त्वाखालील 'एनडीए'ला कौल देऊ शकते. तर राहुल गांधींऐवजी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी जनतेच्‍या पसंतीस उतरले आहेत. राहुल गाधींना दुसरी तर विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखेरची पंसती जनतेने दिली आहे.

एबीपी न्‍यूज-नेल्‍सन यांच्‍या सर्वेक्षणात जनतेने मते मांडली आहेत. सर्वेक्षणानुसार, एनडीएला 39 टक्‍के तर युपीएला 22 टक्‍के मते मिळतील. हे सर्वेक्षण 10 ते 17 जानेवारी या कालावधीत 28 शहरांमध्‍ये करण्‍यात आले. त्‍यात 8842 जणांचा सहभाग होता. सर्वांना पंतप्रधानपदासाठी पसंती विचारण्‍यात आली. त्‍यानुसार, नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक मते मिळाली. राहुल गांधी यांना दुस-या क्रमांकाची तर मनमोहन सिंग यांना अखेरची पसंती मिळाली.

पक्षनिहाय मतांचा विचार केल्‍यास 36 टक्के मतदारांनी भाजपला मत देण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि फक्त 18 टक्के मतदारांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला मत देण्याची इच्छा व्यक्त केली.