आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडित नेहरु यांच्याप्रमाणेच नरेंद्र मोदी लोकप्रिय- अशोक सिंघल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणेच लोकप्रिय असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी व्यक्त केले आहे.

सिंघल म्हणाले, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल ऐकले होते, ते लोकप्रिय नेते होते. त्यावेळी भारतातील तमाम लोकांना वाटत होते नेहरुंनी पंतप्रधान व्हावे. त्याप्रमाणे त्यांना संधी मिळाली व नेहरुंनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. आता तशीच परिस्शिती नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत झाली आहे. मोदी गुजरातबरोबरच देशात प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. देशातील तमाम नागरिकांची इच्छा आहे की, मोदी यांनी आता पंतप्रधानपदी बसावे. त्यामुळे नेहरुंप्रमाणेच मोदी आज देशात लोकप्रिय आहेत. मोदी देशात खूप लोकप्रिय नेते असल्याने त्यांच्या नावाचे उघडपणे समर्थन करण्यास मला आनंदच होत आहे, असेही सिंघल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आज राजनाथसिंग अलाहाबादमध्ये दाखल होत असून, समस्त सांधू-संत व अखाड्यातील प्रमुखांना भेटणार आहेत. दुसरीकडे, विहिंपचे नेते यांनी मोदी यांचे थेट नाव घेता कुंभ मेळ्यात येणा-या सर्व हिंदुचे स्वागत असल्याचे म्हटले आहे.

सिंघल यांनी नेहरुंप्रमाणेच नरेंद्र मोदी लोकप्रिय असल्याचे म्हटल्यानंतर काँग्रेसने कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही. यावर आता काँग्रेस काय प्रतिक्रिया देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.