आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi May Lead Election Campaign Of BJP In Next Loksabha Elections

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभा निवडणुकीत भाजपच्‍या प्रचाराची धुरा मोदींकडे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची धुरा गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍याकडे सोपविण्‍याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतल्‍याची चर्चा आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करण्‍यात येणार असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार मोदींची लोकप्रियता पाहता निवडणूक समितीचे अध्यक्ष त्यांनाच बनवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करावे, अशी मागणी भाजपचे अनेक नेते करीत आहेत. परंतु, अद्याप तसे जाहीर करण्‍याबाबत संघ आणि भाजप थिंक टँकमध्‍ये एकमत झालेले नाही. त्यामुळे मोदींना नवी भूमिक देऊन पंतप्रधानपदाच्‍या उमेदवारीचा मुद्द तुर्तास बाजुला ठेवावा, असा मतप्रवाह भाजपमध्‍ये निर्माण झाला आहे. मोदींकडे प्रचाराची धुरा सोपविण्‍याबाबत भाजपमध्‍ये एकमत झाले आहे. मोदींच्‍या नव्‍या भूमिकेला संघानेही हिरवा कंदील दिला आहे. पुढील महिन्‍यात भाजपच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारीणीची बैठक होणार आहे. त्‍यात या निर्णयावर शिक्‍कामोर्तब होऊ शकते.

भाजप येत्या निवडणुकांच्या प्रचारात सुशासनाच्या मुद्यावर भर देणार आहे. त्यामुळे मोदींना प्रचार मोहीमेत अग्रेसर ठेवण्यात येणार आहे. शिवाय नरेंद्र मोदी पक्षाचे सर्वात लोकप्रिय नेते असल्याने त्यांच्याकडे निवडणूक प्रचाराची धुरा सोपवण्यात आली आहे, असे सांगण्‍यात येत आहे.