आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Told Us 2002 Riots Were Unfortunate Says EU Envoys

गुजरात दंगल दुर्दैवीच! दशकभरानंतर नरेंद्र मोदींची कबुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सन 2002 मध्ये झालेली गुजरात दंगल दुर्दैवीच होती, अशी कबुली नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. गुजरात दंगलीचा ठपका ठेवून युरोपियन संघाने (ईयू) मोदींवर बंदी लादली होती. मोदींनी दंगलीबद्दल खेद व्यक्त केल्यानंतर युनियने ही बंदी उठवली. पंतप्रधानपदावर डोळा असलेल्या मोदींनी प्रथमच गुजरात दंगलीबद्दल अशाप्रकारे खेद व्यक्त केला आहे.

जर्मनीचे राजदूत मायकेल स्टेनर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. युरोपियन संघातील देशांच्या प्रतिनिधींसमवेत महिनाभरापूर्वीच मोदींची बैठक झाली होती. गुजरात निवडणुकीनंतर नव्याने आढावा घेण्याचे जर्मनी व युनियनने ठरवले होते. त्यानुसार मोदींशी थेट बोलणी करण्यात आली. भारतातील न्यायसंस्थेबद्दल आम्हाला आदर वाटतो. तसेच भारतातील लोकशाही संस्थांवरही आमचा विश्वास आहे. आता एक नवा टप्पा गाठला आहे, असे स्टेनर यांनी सांगितले.

मोदींच्या क बुलीविषयी अधिक तपशील देण्यास स्टेनर यांनी नकार दिला. दरम्यान, मोदींच्या कबुलीविषयीची माहिती गुरुवारी युरोपियन युनियनचे राजदूत जोओ क्रेव्हिन्हो यांनी उघड केली. मोदींसंबंधी युरोयिन संघाने मवाळ धोरण स्वीकारले का, असे छेडले असता क्रेव्हिन्हो यांनी त्याला प्रश्नाला सफाईने टाळले. दंगलीचे उत्तरदायित्व कुणावर आहे याचे उत्सुकता केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील लोकांना आहे. त्याकडे युरोपही लक्ष ठेवून आहे, असे ते म्हणाले.

जर्मन वकिलातीमध्ये महिनाभरापूर्वी बैठक - जर्मन वकिलातीमध्ये युरोपियन संघातील प्रतिनिधींसाठी 7 जानेवारी रोजी सकाळी मेजवानी आयोजित करण्यात आली होती. मेजवानीसाठी मोदींनी खास हजेरी लावली. तब्बल महिनाभर या बैठकीबद्दलची माहिती दडवण्यात आली. ती गुरुवारी युरोपियन संघाचे राजदूत जोओ क्रेव्हिन्हो यांनी उघड केली.

हीच वेळ योग्य - मोदींसोबत पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचे युरोपियन संघाचे मत आहे. एकतर ते सलग तिस-यांदा निवडणूक जिंकले आहेत आणि न्यायालयात त्यांच्याविरोधात एकही निकाल नाही. आगामी काळात ते राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका अदा करतील, असाही विश्वास युरोपिय देशांना वाटतो.

पुढे काय ?
गुजरात निवडणुकीपूर्वीच ब्रिटनने मोदींवरील बहिष्कार मागे घेतला होता. सन 2002 च्या दंगलीनंतर सर्वप्रथम ब्रिटननेच बंदी लादली होती. त्यापाठोपाठ अमेरिका आणि युरोपियन संघाने बंदी लादली.अमेरिकेन मोदींना दोनवेळा व्हिसा नाकारला होता. मात्र, आता ब्रिटननंतर अमेरिकेतही मोदींवरील बहिष्कार मागे घेण्याची मागणी जोर धरत आहे.

अमेरिकेचा व्हिसा मिळाला का ? - अमेरिकेचा व्हिसा त्यांना मिळाला का, शहरी कल्पनाविश्वात रंगणा-या मोदींना अ‍ॅग्रिकल्चर (शेती)चे स्पेलिंगही माहिती नाही. ते गरीब व महिला विरोधी आहेत. - रेणुका चौधरी, प्रवक्त्या, काँग्रेस

अणुबॉम्बप्रमाणे पंतप्रधानांचा शोध - पंतप्रधानांचा शोध अणुबॉम्बसाठीच संशोधन सुरूअसल्यासारखा घेतला जातोय. रालोआचा उमेदवार योग्यवेळीच ठरवला जाईल. -शरद यादव, अध्यक्ष, जदयू