आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नक्षलग्रस्त भागात जिद्दीने भिडली तरुणांची फौज!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हर्षवर्धन यांनी टेक्सास विद्यापीठातून औद्योगिक अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. सध्या ते आंध्र प्रदेशातील पाडेरू आणि परिसरातील नक्षलग्रस्त आदिवासी भागात ‘गरिबी निर्मूलन’ अभियानात काम करू लागले आहेत. त्यांच्यावर पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोशिपअंतर्गत (पीएमआरडीएफ) नक्षलग्रस्त भागात काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आणखी एक तरुण व्यावसायिक राजेंद्र मद्रासच्या आयआयटीमध्ये शिक्षण पूर्ण करून सिंगापूरच्या नॅशनल विद्यापीठातून सार्वजनिक धोरण कार्यक्रम या विषयातील पदवी संपादन करून मायदेशी परतले आहेत. त्यांनाही नक्षलग्रस्त भागात काम करण्याची संधी आव्हानात्मक वाटली. आता ते मंडसा गावात सरकारचे दूत बनून गरिबी निर्मूलन आणि आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांचा एक अविभाज्य घटक बनले आहेत. पूजाने दिल्लीत राहून आयएएसची तयारी केली. तिचीही फेलोशिपसाठी निवड झाली आणि आता ती बेडरपणे जंगलामध्ये वसलेल्या नक्षलग्रस्त गावांमध्ये गरिबांचे दु:ख आणि वेदना समजून घेऊ लागली आहे.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडच्या अनेक नक्षलग्रस्त भागात सरकारने माओवाद्यांचा प्रभाव पुसून टाकण्यासाठी सुरू केलेल्या अभियानामध्ये असे अनेक तरुण हिरीरीने सहभागी होऊ लागले आहेत. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांनी काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे या तरुणांशी चर्चा करून त्यांच्याकडून फिल्ड रिपोर्ट घेतला आणि त्यांच्या जिद्दीचे तोंडभरून कौतुक केले. या तरुणांचे अनुभव जाणून घेतल्यानंतर रमेश यांनी त्यांच्याकडून भावी कार्ययोजनेची माहितीही घेतली.
आव्हानांना तोंड द्यायचेय!
हे काम अत्यंत आव्हानात्मक आहे. नक्षलग्रस्त भागात कोणताही सरकारी अधिकारी थांबायला तयार होत नाही. आम्ही जिथे कुठे जातो, तेथे आम्हाला आधी तुमचा काय ‘इंटरेस्ट’ आहे, हे आधी विचारले जाते, असे नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेला असाच एक तरूण बालाकृष्ण रेड्डी यांने सांगितले. आम्ही जेथे जातो तेथे रस्ते, शौचालय, मनरेगासह केंद्र सरकारच्या सर्वच योजनांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी लोक आमच्याकडे करतात. मी पथापतमन गावात गेले तर जाऊ नको, लोकांना मनरेगाचे पैसे मिळाले नाहीत, ते तुला पकडून ठेवतील, असे पोलिस उपनिरीक्षकाने सांगितले, असे या टीममध्ये असलेली एकमेव तरुणी पूजाने सांगितले. या परिसरात जे डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत ते गावात जातच नाहीत. आरोग्य सुविधांची स्थिती दयनीय आहे. प्रशासकीय अधिकाºयांच्या वर्तनाबद्दल पावलोपावली तक्रारी ऐकायला मिळतात, असे अनुभव कथन चेतन गौतम या तरुणाने केले. गावाच्या प्राथमिक गरजांची पूर्तता कशी करता येईल, हे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. सरकाराला फीडबॅक देत राहू, असे एमबीए झालेल्या रमेश रेड्डी या तरुणाने सांगितले.
एक कोटीपर्यंत खर्चाचा तरुणांना अधिकार
या तरुणांच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याच्या महत्त्वाकांक्षेने आदिवासी भागात अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. पीएमआरडीएफसाठी निवड झालेले तरुण त्यांच्या विवेकाने एखाद्या विशेष योजनेवर एक कोटी रुपयांपर्यंत खर्चाची शिफारस करू शकतात. आंध्र प्रदेशातील आदिवासी भागातील आयुक्त सोमेशकुमार यांनी ‘दिव्य मराठी नेटवर्क’ला सांगितले की, निवडक भागात गरिबी निर्मूलन अभियानांतर्गत कालबद्ध योजना तयार करण्यात आली आहे. युवा प्रोफेशनल्सना या भागात आधी मूलभूत सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात येईल. त्याद्वारे संबंधित परिसरात कोणत्या प्रकारचे काम प्राधान्याने करण्याची आवश्यकता आहे, हे निर्धारित करण्यात येणार आहे.
नक्षल भागात रात्रीच्या गस्तीसाठी ‘रात की आंख’