आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Naxal Killed By Villagers After Molestation With A Girl

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलेची छेड काढणा-या 3 नक्षलवाद्यांचा गावक-यांनी केला खात्‍मा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- झारखंडच्‍या गुमला जिल्‍ह्यात एका गावामध्‍ये तरुणींची छेड काढणा-या नक्षलवाद्यांना गावक-यांनी जबर मारहाण करुन ठार केले. ही घटना संवारिया डाडटोली गावात आज सकाळी घडली. पोलिसांनी गावक-यांच्‍या हिमतीची दाद दिली असून गावाच्‍या संरक्षणाचे आश्‍वासन दिले आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, सकाळी 7 वाजता गावात नक्षलवादी शिरले. त्‍यांनी मुलींची छेड काढली. त्‍यानंतर गावक-यांनी तिघांचा पाठलाग करुन पकडले आणि घरात ठेवलेल्‍या शस्‍त्रांनी बेदम मारहाण केली. त्‍यात तिघांचा जागीच मृत्‍यू झाला. तिघांकडून पोलिसांनी दोन पिस्‍तुल, 6 जिवंत काडतुसे आणि 3 मोबाईल जप्‍त केले आहेत. तिघांपैकी एकाची ओळख पटली असून त्‍याचे नाव परमेश्‍वर बालेश्‍वर उरांव असे असून तो डोढीटोली गावातील रहिवासी होता.