आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षली प्रशिक्षणासाठ‍ी ‘हॉलीवूड’चे मॉडेल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - नक्षल्यांच्या प्रशिक्षणामध्ये हॉलीवूड अ‍ॅक्शनपटाची छाप जाणवत असल्याचा दावा वरिष्ठ पोलिस अधिका-याने केला आहे. मृत सीआरपीएफ जवानाच्या शरीरात नक्षल्यांनी शस्त्रक्रिया करून स्फोटके ठेवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या कृतीचा संबंध 2008 मधील ऑस्कर विजेता चित्रपट ‘हर्ट लॉकर’शी जोडता येईल, असे या अधिका-या ने सांगितले.

छत्तीसगड पोलिसांनी बिजापूर जिल्ह्यातील नक्षल्यांच्या प्रशिक्षण शिबिरातून बिहाइंड एनेमी लाइन्स, डेल्टा फोर्स, डाय हार्ड, मॅट्रिक्स आणि गॉड मस्ट बी क्रेझी या चित्रपटांच्या सीडी जप्त केल्या. यामध्ये अ‍ॅक्शन, कमांडो ट्रेनिंग, बॉम्ब व युद्धविषयक रणनीतीशी संबंधित चित्रपटाचा समावेश होता, अशी माहिती अतिरिक्त महासंचालक आर. के. विज यांनी दिली.गुन्ह्याची रणनीती ठरवण्यासाठी नक्षली हॉलीवूड चित्रपटाचा वापर करतात. तसेच नवीन शस्त्रास्त्राची माहिती त्यांच्याकडून या पद्धतीने मिळवली जाते, असे एका अधिका-या ने सांगितले.