आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलग्रस्त भागात 2200 मोबाइल टॉवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नक्षलवाद्यांना ग्रामस्थांनी मोबाइल न वापरण्याचा इशारा दिलेला असतानाच सरकार मात्र नक्षलप्रभावित भागात मोबाइल सेवेचा विस्तार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तीन हजार कोटी रुपये खर्च करून नऊ नक्षलग्रस्त राज्यांत 2200 टॉवर उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी ही माहिती दिली. टॉवर उभारणीच्या प्रत्यक्ष कामास या महिनाअखेरीस सुरुवात होणार आहे.