आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनसीसीच्या विद्यार्थिनींची छेड, 10 जवान अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशात सशस्त्र सीमादलाच्या 10 जवानांना छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एनसीसीच्या विद्यार्थिनींनी हा आरोप केला आहे.

जीआरपी इन्स्पेक्टर रतनसिंह यादव यांनी सांगितले की, प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित परेडसाठी गेलेल्या एनसीसीच्या मुली दिल्लीहून गुवाहाटीला परतत होत्या. एसएसबी जवानदेखील ट्रेनिंग संपवून जात होते. धावत्या रेल्वेत या जवानांनी विद्यार्थिनींची छेड काढली, असा आरोप आहे. मुलींच्या तक्रारीवरून जवानांना मुगलसराय स्थानकात अटक करण्यात आली. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणातील हे जवान आहेत.