आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाती मृत्यू टाळण्याची केंद्र सरकारची योजना

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील महामार्गावर होणारे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी केंद्र सरकारने देशातील प्रमुख महामार्गांजवळील गावातील लोकांना आपत्कालीन उपचारांबाबत जागरूक करण्याबरोबरच प्रथमोपचारांचे प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेतला आहे.
या कार्यात जास्तीत जास्त गावांना सहभागी करून घेण्यासाठी केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत काम करीत असलेल्या नेहरू युवा केंद्राच्या राष्टÑव्यापी नेटवर्कचा उपयोग करण्याचाही
सरकार विचार करीत आहे. या विषयी रस्ते व परिवहन मंत्रालय आणि नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधींची एक बैठकही
नुकतीच झाली.
नेहरू युवा केंद्राच्या एका अधिकाºयाने सांगितले की, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली-जयपूर, दिल्ली-आग्रा, दिल्ली-चंदिगड-शिमला राजमार्गासह दिल्ली-लखनऊदरम्यान राष्ट्रीय महामार्ग 24 वर हे कार्य सुरू करण्याबाबत विचारविनिमय केला जात आहे.
देशात दर 13-14 मिनिटांनी एक व्यक्ती रस्ता अपघातात मृत्युमुखी पडते. यातील अर्ध्या लोकांचा मृत्यू त्वरित प्रथमोपचार न मिळाल्याने होतो. रस्त्यावरील अपघातानंतर तत्काळ प्रथमोपचार मिळाल्यास हे मृत्यू टाळता येतात. एका अधिकाºयाने सांगितले की, या उद्देशानेच देशातील प्रमुख हायवेजवळील गावांतील लोकांना आपत्कालीन प्रथमोपचार नेटवर्कमध्ये सामील करून घेण्याचे कार्य प्रस्तावित आहे.
या अंतर्गत सर्वात आधी महामार्गांवरील अपघातप्रवण ठिकाणे ठरवली जातील. तेथील स्थानिक पंचायत, अशासकीय संस्था आणि जागरूक लोकांना भेटून जखमींना रुग्णालयात पोहोचवणे आणि त्यांच्यावर उपचार होण्यासाठी योजना आखली जाईल.
नेहरू युवा केंद्र राष्टÑव्यापी असल्यामुळे आणि सरकारच्या अधीन कार्य करीत असल्यामुळे ही योजना राबवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. अशा इतर संघटनाही कालांतराने या कार्यात समाविष्ट केल्या जातील, अशी माहितीही या अधिकाºयाने दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे की, भारतात रस्ते अपघातात दरवर्षी 1.18 लाख लोक
अकाली मृत्युमुखी पडतात. या योजनेमुळे हे जीव वाचण्याची शक्यता आहे.

योजनेचा आराखडा
> महामार्गावरील अपघातप्रवण वळणांजवळील गावातील लोकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले जाईल.
> सीटबेल्ट बांधणे, वेगमर्यादा पाळणे, अशा छोट्या परंतु महत्त्वाच्या बाबींसाठी जनजागरण मोहीम राबवली जाईल.
> महामार्गांजवळील निवड केलेल्या गावांतील गावकरी आणि नजिकच्या रुग्णालय-डॉक्टरांच्या साखळीद्वारे अपघातातील जखमींना तत्काळ वैद्यकीय मदत मिळवून देण्याची व्यवस्था.
> नेहरू युवा केंद्र गावक-यांच्या मदतीने सुरक्षा मोहीम राबवील.