आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते बांधकामासाठी सरकारचे नवे मॉडेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रस्त्यांच्या बांधकामामध्ये वेळ व पैशांची बचत व्हावी म्हणून सरकारने एक मॉडेल तयार केले आहे. शुक्रवारी कॅबिनेटच्या पायाभूत प्रकरणाशी संबंधित समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
ज्या राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीचे काम सरकार-खासगी भागीदारी तत्त्वावर होत नाही. अशी प्रकरणे सरकारने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. असे मार्ग ईपीसी मॉडेलनुसार पूर्ण करण्यात येतील. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यासाठी दुरुस्तीच्या 4 विधेयकांनाही शुक्रवारी मंजुरी दिली. त्यात तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण संस्थेतील अयोग्य आचरण प्रतिबंधक विधेयकाचाही समावेश आहे. तांत्रिक शिक्षण संस्थांतील गैरव्यवहार रोखण्याचा विषय त्यात समाविष्ट करण्यात आला आहे. आयआयआयटी विधेयकात प्रशासकीय स्वायत्तता व एकरूपता देण्याचा प्रस्ताव आहे. देशात नवीन 20 संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. स्ट्रीट व्हेंडर्स विधेयक, परदेशी सरकारी अधिकारी सार्वजनिक
आंतरराष्ट्रीय संस्था लाच प्रतिबंधक मसुद्याचाही समावेश यात आहे.