आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हावडा मार्गावरील रेल्‍वेगाड्यांचे वेळापत्रक पूर्वपदावर, रात्रीची वाहतूक सुरु

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाताः तब्‍बल 19 महिन्‍यांच्‍या कालावधीनंतर खडकपूर-टाटानगर स्‍थानकादरम्‍यान रात्रीची रेल्‍वेसेवा पूर्वपदावर आली आहे. त्‍यामुळे या मार्गावरुन धावणा-या प्रवासी रेल्‍वेगाड्या आता नियोजित वेळेनुसार धावू लागल्‍या आहेत.
नक्षलवाद्यांनी घातपात घडविल्‍यामुळे हावडा-मुंबई ज्ञानेश्‍वरी एक्‍स्प्रेसला 28 मे 2010 रोजी भीषण अपघात झाला होता. त्‍यात 150 जणांचा मृत्‍यू झाला होता. या घटनेनंतर खडकपूर-टाटानगर या स्‍थानकांदरम्‍यान रात्रीची रेल्‍वेवाहतूक पुर्णपणे बंद करण्‍यात आली होती. परिणामी प्रवासी रेल्‍वेगाड्यांचे वेळापत्रकही बदलण्‍यात आले होते. अनेक गाड्या 8 ते 9 तास विलंबाने सोडण्‍यात येत होत्‍या. या गाड्या आता नियोजित वेळापत्रकानुसार धावू लागल्‍या आहेत. यापैकी महाराष्‍ट्रातून धावणा-या हावडा-मुंबई-हावडा ज्ञानेश्‍वरी एक्‍स्‍प्रेस, हावडा-मुंबई-हावडा समरसता एक्‍स्‍प्रेस, हावडा-मुंबई-हावडा मेल, हावडा-पुणे-हावडा आझाद हिंद एक्‍स्‍प्रेस या गाड्या आता पूर्वीप्रमाणेच धावू लागल्‍या आहेत.
रेल्‍वे मंडळाने सुरक्षेचा आढावा घेतल्‍यानंतर वाहतूक पुर्वपदावर आणण्‍यास हिरवा कंदील दिला होता. केंद्रीय गृहमंत्रालयानेही राज्‍यसरकारला सुरक्षेबाबत आढावा घेतल्‍यानंतर सूचना दिल्‍या होत्‍या. ही वाहतूक पूर्वपदावर आणण्‍यासाठी गेल्‍या काही महिन्‍यांपासून मागणी होत होती. सरकारवर दबावही वाढत होता. त्‍यानंतर दोन महिन्‍यांपूर्वी या मार्गावर प्रायोगि‍क तत्त्वावर रात्रीची वाहतूक सुरु केली होती.
रेल्‍वे सुरक्षेचे होणार ऑडीट
ओरिसात माओवाद्यांनी सुरुंगस्फोटाने रेल्वेरुळ उडविला