आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nirmal Baba Arrested To Cancel Dissension To Lucknow High Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्मल बाबांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ: कृपेचा व्यापार करुन आपल्या भक्तांची दिशाभूल करणार्‍या निर्मल बाबांना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने मंगळवारी दिलासा दिला. निर्मल बाबांच्या अटकेवर न्यायालयाने स्थगिती आणली.
न्यायाधिश अश्चिनी कुमार सिंग आणि सइदुल जमात सिद्धीकी यांच्या सुटीच्या काळातील खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे पुढील निर्णय येईपर्यत निर्मल बाबांना अटक होऊ शकत नाही.
दरम्यान, समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि भक्तांची दिशाभूल केल्यावरून ‍निर्मल बाबांविरोधात 10 मे रोजी न्यायालयात याचिका दाखल करण्‍यात आला होती. निर्मल बाबांना अटक करण्याची मागणीही त्यात केली होती. परंतु, या याचिकेविरोधात निर्मल बाबांच्या वकीलांनी न्यायालयात फेरयाचिका दाखल केली होती. त्यावर लखनऊ खंडपीठाने निर्मल बाबांच्या अटकेवर स्थगिती दिली आहे.
निर्मलबाबांना प्रतिवादी बनवा; केंद्र- दिल्ली सरकारला नोटीस