आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेक्स स्कॅंडल : स्वामी नित्यानंदांचा रंजिताला घेऊन भारताबाहेर पसार होण्याचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सेक्स स्कॅंडलमधील आरोपी स्वामी नित्यानंद पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचा व दक्षिणात्य अभिनेत्री रंजिता यांचा एकत्र पासपोर्ट सापडल्यावरुन वाद तयार झाला आहे.
याबाबत सांगितले जात आहे की, स्वामी नित्यानंद हे आपल्या जवळच्या रंजिताबरोबर परदेशात पसार होण्याच्या तयारीत आहेत. या दोघांचे पासपोर्ट दिल्ली विमानतळावर एकत्र मिळाले आहेत. नित्यानंद सध्या नेपाळमध्ये वास्तव्याला आहेत.
दिल्लीतून नित्यानंद यांच्या ३२ समर्थकांचे पासपोर्ट मिळाले आहेत. कस्टम विभागाने नितिन कौशिक नावाच्या व्यक्तीकडून हे पासपोर्ट जप्त केले आहेत. नितिन एक ट्रॅवल एजन्सी चालवतो. तसेच तो व्हीआयपी लोकांना पर्यटनासाठी व परदेशी वारी घडवून आणतो.