आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींमुळे कॉंग्रेसच्‍या जवळ जात आहेत नितीश कुमार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी अर्थसंकल्‍पावरुन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे कौतूक केल्‍यामुळे एनडीएमध्‍ये खळबळ उडाली आहे. एनडीएमध्‍ये फुट पडत असल्‍याचेच संकेत यातून मिळत असल्‍याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु झाली आहे. कॉंग्रेसला मात्र नितीश कुमारांच्‍या स्‍तुतिचा आनंदच झाला आहे.

नितीश कुमार यांनी चिदंबरम यांचे तीन वेळा आभार मानले. याचे कारणही त्‍यांनी सांगितले. ते म्‍हणतात, मागासलेल्‍या राज्‍यांसाठी नवे मापदंड बनविण्‍याचे चिदंबरम यांनी सांगितले आहे. हे तर आम्‍ही अनेक वर्षांपासून सांगत आलो आहोत. हा आमच्‍या विचारधारेचा विजय आहे. अर्थमंत्र्यांनीही हे मान्‍य केले आहे. म्‍हणूनच आम्‍ही त्‍यांचे आभार मानतो.

नितीश कुमार यांनी अर्थमंत्र्यांची स्‍तुति केल्यानंतर आता जेडीयू एनडीएमधून बाहेर पडणार असल्‍याची चर्चा सुरु झाली आहे. नितीश कुमार कॉंग्रेससोबत जाऊ शकतात. याचे एक मोठे कारण आहे, ते म्‍हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांच्‍या पंतप्रधानपदाच्‍या उमेदवारीसाठी भाजपतील बडे नेते फिल्‍डींग लावत आहेत. तर स्‍वतः नितीश कुमार पंतप्रधानपदाच्‍या शर्यतीत आहेत. त्‍यामुळे मोदी आणि नितीश कुमार यांच्‍यात संघर्ष निर्माण झाला आहे.

भाजपनेही नितीश कुमार यांच्‍या बदलत्‍या राजकारणासाठी तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजप नवा नारा देणार आहे. हा नारा आहे, 'सुशासन संकल्‍प, भाजप विकल्‍प'. पक्षाच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारीणीच्‍या बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब होण्‍याची शक्‍यता आहे.