आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Any Settlement With Ramdev Out Of Court, The Government Has Done Nothing Wrong

रामदेव बाबांसोबत न्यायालयाबाहेर कोणतीही तडजोड नाही - वीरभद्र सिंह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला - सोलन जिल्ह्यातील साधूपुल येथील योगगुरु रामदेव बाबा यांच्याकडून परत घेतलेल्या जमीनीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी या भुखंडाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे असे सांगून, त्याबद्दल रामदेव बाबांशी न्यायालयाबाहेर कुठलीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, या प्रकरणी न्यायालय जो निर्णय देईल त्याचा आम्ही सन्मान करु.

त्यांनी स्पष्ट केले की, सरकार न्यायालयाबाहेर कोणतीही तडजोड करणार नाही. ते म्हणाले, शासनाने भाडेतत्वावर दिलेला भुखंडाचा करार रद्द केला यात आम्ही काहीही चूक केलेले नाही. यापुढे न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल.