आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौटालांना जामीन मिळेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तब्येतीचे कारण पुढे करूनही हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना दिलासा मिळाला नाही. प्रकृती ढासळण्याच्या कारणावरून दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला असून तुरुंगअधिका-या कडून त्यांच्या प्रकृतीचा अहवाल मागवला आहे.

3206 कनिष्ठ शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी चौटाला दहा वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. 16 जानेवारीपासून ते तिहार तुरुंगात आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अंतरिम जामीन मिळावा अशी विनंती याचिका त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. 78 वर्षीय चौटाला विविध व्याधींनी बेजार असून त्यांना वैदयकीय मदतीची गरज आहे, असा युक्तिवाद त्यांचे वकील गोपाल सुब्रह्मण्यम यांनी केला. त्यानंतर न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी सीबीआयचेही मत मागवले व पुढील सुनावणी 4 एप्रिल रोजी ठेवली .