आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मनमोहनसिंग कडाडले; पाकशी मैत्रीपूर्ण संबंध अशक्यच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय लष्करप्रमुख आणि कमांडर्सनी कठोर भूमिका घेतल्यानंतर आता पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही पाकिस्तानला ठणकावले. ‘आमच्या जवानांच्या हत्या झाल्या तरी सारे काही आलबेल राहील, या भ्रमात पाकिस्तानने राहू नये. ज्यांनी हेमराजचे शिर कापून नेले त्यांना कठोर शासन व्हायलाच हवे’, असे त्यांनी म्हटले आहे.

हत्येचे आरोप फेटाळून चालणार नाही. सत्य मान्य करावेच लागेल, असेही त्यांनी सुनावले. पंतप्रधानांचा हा इशारा केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता थेट अमलातही आला. वाघा बॉर्डरवरून भारतात येणा -या 65 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी व्हिसा धोरण लवचिक करून त्यांना तत्काळ व्हिसा मंगळवारपासूनच दिला जाणार होता. दोन्ही बाजूंनी ज्येष्ठांची गर्दीही झाली होती. मात्र, दिल्लीहून आदेश आला आणि हे व्हिसा धोरण ऐनवेळी स्थगित करण्यात आले. हॉकी स्पर्धेत खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनाही परतण्याचे आदेश देण्यात आले. रात्री पंतप्रधानांनी तिन्ही सेनादलप्रमुखांशी चर्चा केली. पाकच्या अमानुष कारवाईला ठोस प्रत्युत्तर द्यावे, अशी भावना या वेळी तिन्ही प्रमुखांनी व्यक्त केली. दरम्यान, राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांची भेट घेतली.