आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलाहाबादच्या कुंभनगरीत एकता कपूरला \'नो एंट्री\'; अमरसिंहांनी मारली डुबकी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबादमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यातील धर्म अखाडा राजकीय अखाडा बनला आहे. असे असताना मात्र बॉलिवूडमधील मंडळींना कुंभ मेळ्यात आपल्या चित्रपटाचा प्रचार करण्याची संधी मिळणार नसल्याचे दिसत आहे. कुंभमेळा प्रशासन चित्रपट जगतातील व्यक्तींना त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कुंभनगरीत परवानगी देण्याच्या मूडमध्ये नाही. प्रशासन अधिका-यांना ज्या प्रमुख सहा स्‍नान तिथी आहेत त्या दिवशीही सेलिब्रिटीजना कुंभनगरीत सुरक्षा देण्याची शक्यता कमी आहे.

एकता कपूर आणि तिचा येऊ घातलेला चित्रपट 'एक थी डायन' याची संपूर्ण टीम कुंभ मेळ्यात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची तयारी केली आहे. मात्र कुंभमेळा सुरक्षा अधिका-यांनी त्यास इन्कार दिला आहे. 'एक थी डायन'ची टीम आज लखनौत प्रमोशन करीत आहे. त्यानंतर त्यांचा अलाहाबादला जाण्याचे नियोजन होते. या प्रमोशन टीममध्ये एकता कपूर, इम्रान हाश्मी आणि हुमा कुरेशी यांचा समावेश आहे. हे सर्व जण आता ९ फेब्रुवारीला कुंभनगरीत जात असून तेथे परमार्थ निकेतन यांच्यातर्फे आयोजित यज्ञात सहभागी होत आहेत.