आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतात अवकाळी पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर भारताला मंगळवारी बेमोसमी पावसाने झोडपून काढले. दिल्लीत पन्नास वर्षांतील विक्रमी पाऊस झाला. काश्मीर, उत्तराखंडच्या डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांत कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे.फरिदाबादमध्ये गारा पडल्याचेही वृत्त आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात प्रचंड पाऊस झाला. बुधवारी देखील या राज्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जम्मू आणि इतर भागात सातत्याने पाऊस सुरू आहे. लमर्गमध्ये गेल्या चोवीस तासांत 11 इंच बर्फवृष्टी झाली आहे.
महामार्ग तीन दिवसांपासून बंद : काश्मीर खो-यात बर्फवृष्टीमुळे जनजीवनावर प्रचंड दिसून येत असून मंगळवारी सलग तिस-या दिवशी 300 किमी लांबीचा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद होता. त्यामुळे 400 हून अधिक वाहने ठप्प झाली होती.

राजनाथ, राहुलचे दौरे रद्द : वातावरण खराब असल्यामुळे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आपले दौरे रद्द करावे लागले. राजनाथ मंगळवारी लखनऊला जाणार होते तर राहुल अमेठीला जाणार होते. उपाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच अमेठीला निघाले होते. आता राजनाथ बुधवारी दिल्लीहून अलाहाबादला रवाना होणार आहेत.