आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतात थंडी परतली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काही प्रमाणात तापमान वाढले होते, परंतु पाऊस आणि बर्फ यामुळे उत्तर भारतात पुन्हा एकदा थंडी परतली आहे. राजधानी दिल्लीत मंगळवारी धुक्याचे प्रमाण चांगलेच वाढले होते. त्यामुळे दिल्लीकर पुन्हा एकदा थंडी अनुभवू लागले आहेत.
गेले दोन दिवस आकाश निरभ्र आणि पुरेसा सूर्यप्रकाश असल्याने थंडी काहीशी गायब झाली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु दोन दिवसानंतर बर्फवृष्टी झाल्याने थंडी परतली आहे. दिल्ली सोमवारी रात्री धुक्यात बुडाली होती. 50 मीटर अंतरावरील दिसणे कठीण जात होते. सकाळीपासूनच थंडीचे प्रमाण खूप जाणवत होते. दिल्लीत 0.5 मीमी पावसाची नोंद झाली आहे. किमान तापमान 9.3 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले. सोमवारी तापमान 10.5 सेल्सियस एवढे तर कमाल 20.3 सेल्सियस होते. उत्तर भागातील तापमान हे आता नीचांकी राहणार आहे.
दोन दिवसांनंतर विमानांचे उड्डाण
श्रीनगर येथे गेल्या दोन दिवसांपासून काश्मिर खोºयातील हवामानात झालेल्या सुधारणेमुळे मंगळवारी 20 विमानांच्या उड्डाणास परवानगी देण्यात आली. शनिवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे विमान फेºया रद्द करण्यात आल्या होत्या.