आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Ask Priminister Post ; Consantrate On Party Strengthening Program Rahul Gandhi

पंतप्रधान पदाबद्दल विचारणे चुकीचेच; पक्ष बळकट करण्यालाच प्राधान्य- राहुल गांधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राहुल गांधी हेच काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानपदाचे दावेदार असतील असे मानले जात असले तरी स्वत: राहुल यांनी मात्र पंतप्रधानपदाबद्दल आपल्याला विचारणेच चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पक्ष-संघटना बळकट करण्यालाच आपला प्राधान्यक्रम असल्याचे ते म्हणाले.
आपल्या पक्षाच्या खासदारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान राहुल यांनी पक्षात हायकमांड संस्कृती संपवणे हे आपले ध्येय असल्याचे राहुल म्हणाले.

लग्न, नको रे बाबा ... : महिला खासदारांनी राहुल यांना विवाहाबद्दल विचारले तेव्हा तूर्तास लग्नाच्या बोहल्यावर चढण्याचा आपला विचार नसल्याचे ते म्हणाले. विवाह केला तर मुले होतील. कुटुंब आणि जबाबदा-यांच्या व्यापात मी अडकून पडेन. नंतर कालांतराने माझ्या मुलांनी आपली जागा घ्यावी, असे वाटू लागेल, असेही ते म्हणाले.

संघटनेत आमूलाग्र बदल
काँग्रेस पक्ष व संघटनेत आगामी काळात आमूलाग्र बदलाचे संकेत राहुल यांनी दिले. सर्वच स्तरावरील पदांमध्ये हे फेरबदल केले जाणार असल्याचे सांगून राष्‍ट्रपिता महात्मा गांधी हेच आपले गुरू असल्याचेही ते म्हणाले.