आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमेकांवर चिखलफेकीची इच्छा नाही : प्रणवदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत पी. ए. संगमा यांनी दाखल केलेला आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळल्यानंतर मुखर्जी यांनी हे प्रकरण संपले असल्याचे म्हटले आहे. संगमा यांच्या आरोपाबाबत बोलण्यासारखे काहीच नाही, असे मुखर्जी म्हणाले. घटनात्मक व कायद्याच्या तरतुदीचा दाखला देत निवडणूक आयोगाने मुखर्जी यांचा अर्ज वैध ठरवला आहे.
आपल्याविरुद्धच्या वेगवेगळ्या आरोपांबाबत मुखर्जी म्हणाले की, मला एकमेकांवर चिखलफेक करण्याची इच्छा नाही. निवडणूक प्रचारासाठी मुखर्जी बुधवारी शहरात आले होते. या वेळी त्यांनी कॉँग्रेस, बसपा आणि सपाच्या आमदारांची भेट घेतली. शिवसेना, जनता दल संयुक्त, माकप या पाठिंबा देणाºया पक्षांचे मुखर्जी यांनी त्यांचे आभार मानले. संगमा यांनी सदसद्विवेकबुद्धीनुसार मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर मुखर्जी यांनी प्रत्येकाने नेहमीच सदसद्विवेकबुद्धीनुसार मतदान केले पाहिजे असे म्हटले.