आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Notic Issued To Yog Guru Ramdevbaba's Harbal Company

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योगगुरू रामदेवबाबांच्या हर्बल कंपनीला नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


डेहराडून - योगगुरू रामदेवबाबा यांच्या हर्बल फूड पार्कला उत्तराखंडच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जलस्रोतांमध्ये टाकाऊ पदार्थ सोडण्यात येत असल्याचा आरोप कंपनीवर आहे.

हरिद्वार जिल्ह्यातील पाडार्था येथे हे फूड पार्क आहे. येथील उत्पादनानंतर औद्योगिक टाकाऊ पदार्थ जलाशयात सोडण्यात आला आहे. त्याचा फटका परिसरातील शेती उत्पादनावर होत असल्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव विनोद सिंघल यांनी शुक्रवारी सांगितले. नोटीसीवर उत्तर देण्यासाठी कंपनीला पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कंपनीने औद्यागिक उत्सर्जन थांबवावे, असेही मंडळाने बजावले आहे. प्रदूषण मंडळाने गोळा केलेल्या नमुन्यात रासायनिक पातळीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. डेडलाइनच्या काळात कंपनीने प्रतिसाद दिला नाही तर त्यांना कंपनी बंद करण्याची नोटीस जारी करण्यात येईल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. टाकाऊ पदार्थांचे नमुने हरिद्वार जिल्हा प्रशासनाकडेही दाखल करण्यात आले आहेत.