आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Notice To Prime Minister Over Girl Harassment Case

पश्चिम बंगालमध्‍ये मुलीवर अत्‍याचारप्रकरणी पंतप्रधानांना नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- विश्वभारती विद्यापीठाच्या पाचव्या इयत्तेतील विद्यार्थीनीवर अत्याचार प्रकरणी पंतप्रधानांना हायकोर्टाने अवमानना नोटीस बजावली आहे. पंतप्रधान या विद्यापीठाचे कुलपती आहेत. कोलकाता उच्‍च न्‍यायालयाचे मुख्‍य न्‍या. जे. एन. पटेल आणि न्‍या. संबुधा चक्रवर्ती यांच्‍या खंडपीठाने ही नोटीस दिली आहे. मुलीला स्‍वमूत्र पिण्‍यास बाध्‍य केल्‍यावरुन विद्यापीठाने न्‍यायालयाच्‍या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍याचे या नोटीशीत म्‍हटले आहे.
2004 मध्ये अशा एका प्रकरणात हायकोर्टाने निकाल दिलेला होता. त्‍यानुसार मुलांना कोणत्‍याही प्रकारे शारीरीक आणि मानसिक शिक्षा देण्‍यास प्रतिबंध लावण्‍यात आला होता. न्‍यायालयाने कुलगुरु सुशांत दत्त गुप्‍ता, रजिस्‍ट्रार मणिमुकुट मित्रा, वॉर्डन उमा पोद्दार आणि पश्चिम बंगालचे शिक्षण सचिव विक्रम सेन यांनाही नोटीस पाठविली आहे.
शांतीनिकेतनमध्ये हॉस्टेलच्या वॉर्डनने विद्यार्थिनीला पाजले मूत्र!
प्राध्यापकानेच नेले विद्यार्थिनीला पळवून
विद्यार्थिनीला अश्लील एसएमएस पाठवणारा प्राध्यापक निलंबित