आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Adhar For Scholarship, Fellowship : University Grants Commission

आता ‘आधार’शिष्यवृत्ती, फेलोशिपसाठी ‘: विद्यापीठ अनुदान आयोग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विद्यापीठ व महाविद्यालयांत शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यापीठ अनुदान आयोग(यूजीसी) किंवा राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती, फेलोशिप प्राप्त करू इच्छित असतील तर त्यासाठी त्यांना ‘आधार कार्ड’ चा पुरावा अनिवार्य असेल. शिष्यवृत्ती, फेलोशिपची रक्कम आता बँक खात्याच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय यूजीसीने घेतला आहे.

आयोगाच्या एका अधिका-यांने सांगितले की, शिष्यवृत्ती, फेलोशिपची रक्कम विद्यार्थ्यांपर्यंत सहजरीत्या पोहोचवण्याच्या उद्देशाने यूजीसीने या योजनेला आधार कार्डशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ व महाविद्यालयांना त्यांच्या पातळीवर याची अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आधार कार्ड व यासंदर्भात मदत करण्यासाठी तसेच संस्थांवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठांनी त्यांच्या पातळीवर एका क्षेत्रीय अधिका-या ची नेमणूक करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अधिका-या ने सांगितले की, सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला विशिष्ट ओळखपत्र म्हणून आधार कार्ड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही रक्कम विद्यार्थ्यांना धनादेशच्या रूपात दिली जाते. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीरीत्या होण्यासाठी त्यांना आधारची जोड देण्याची सरकारची भूमिका आहे. याच प्रस्तावाअंतर्गत थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याऐवजी ती बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय यूजीसीने घेतला आहे.
यूजीसीचे दिशानिर्देश जारी
यूजीसीने यासंदर्भात विद्यापीठ व महाविद्यालयांना दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यात या योजनेवर वेगाने काम करण्यास सांगण्यात आले आहे. विद्यापीठांत तसेच महाविद्यालयांत त्यासाठी अधिका-याची नियुक्ती करावी. हा अधिकारी आधार कार्ड, शिष्यवृत्ती तसेच राज्य सरकारशी समन्वय करू शकेल. विद्यार्थ्यांनीही आधार कार्ड काढून घ्यावेत, यासाठी विद्यापीठांनी तसेच महाविद्यालयांनी त्यांच्याकडे पाठपुरावा करावा, असे यूजीसीने म्हटले आहे. अर्थात या योजनेची अंमलबजावणी नेमकी कोणत्या शैक्षणिक वर्षापासून होणार याच्या मुदतीची घोषणा यात करण्यात आलेली नाही.