आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Congress Stop Shooting Upcoming Film On Bhanwari Devi\'s Life

भंवरी सेक्स स्कॅंडलवरील चित्रपटाला आता काँग्रेसचा विरोध; शुटिंग पाडले बंद!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- राजस्थानमध्ये 2011 मध्ये गाजलेल्या भंवरीदेवी अपहरण व हत्याप्रकरणांवर येत असलेल्या चित्रपटाचे शुटिंग मध्यप्रदेश काँग्रेसने बंद पाडले आहे. काँग्रेसचे याबाबत म्हणणे आहे की, आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपला फायदा पोहचविण्यासाठी हा चित्रपट बनविण्यात येत आहे. तुम्हाला माहित असेलच की, राजस्थानमध्ये गाजलेल्या भंवरीदेवी हत्या प्रकरणात राजस्थानमधील काँग्रेसचे बडे नेते अडकलेले आहेत.

मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी म्हटले आहे की, आमच्या पक्षाच्या वतीने मंगलवारी प्रशासनाकडे चित्रपट निर्मात्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर तेथील स्थानिक जिल्हाधिकारी यांनी या चित्रपटाचे तेथे मागील आठ दिवसापासून सुरु असलेले शुटिंग थांबवण्याचे आदेश दिले आहेत. एवढे होऊनही या चित्रपटाचे शूटिंग बंद केले नाही तर आमचे कार्यकर्ते सेटवर जाऊन प्रदर्शन करतील, असे सलूजा यांनी स्पष्ट केले. तसेच हा चित्रपट जर निवडणुकांच्या तोंडावर रिलीज करणार असाल तर विश्वरुपमसारखी स्थिती करु. तसेच या चित्रपटाच्या विरोधात सेन्सर बोर्ड आणि हायकोर्टात जावून बंदी घालू, असेही सलूजांनी सांगितले.

एक आठड्यापासून सुरु आहे शूटिंग- भंवरीदेवीच्या आयुष्यावर प्रकाश टाकणा-या या चित्रपटाचे शुटिंग मागील आठवड्यात मध्यप्रदेशात सुरु झाले आहे. या चित्रपटाचे शुटिंग युनिट गेल्या आठ दिवसांपासून इंदूरमध्ये खंडवा रोडवरील एका फॉर्महाऊसवर शुटिंग करीत आहे. या चित्रपटाचे निर्माते के. सी. बोकाडिया आहेत. या चित्रपटात भंवरीदेवीची भूमिका हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत करणार आहे.