आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Kiran Bedi Moves Away From Anna Hazare Movement

अण्‍णा हजारेंच्‍या आंदोलनातून किरण बेदीही बाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्‍या टीममधून माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी बाहेर पडल्‍या आहेत. अण्‍णा हजारेंनी दिल्‍लीतील संपूर्ण टीम बदलण्‍याचा निर्णय घेतला आहे. किरण बेदी या आतापर्यंत अण्‍णांच्‍या टीममध्‍ये महत्त्वपूर्ण सदस्‍य होत्‍या.

अण्‍णा हजारे आणि किरण बेदी यांच्‍या लोकपाल विधेयकाच्‍या मसुद्यावरुन काही दिवसांपूर्वीच मतभेद समोर आला होता. त्‍यानंतर अण्‍णांच्‍या नव्‍या टीममध्‍येही सर्वकाही आलबेल नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. आता अरविंद केजरीवाल यांच्‍यानंतर किरण बेदी यांनाही अण्‍णांनी बाजुला केले आहे. किरण बेदी यांच्या नेतृत्वात दक्षिण दिल्लीत सुरू असलेले याचे कार्यालय बंद करण्यात आले आहे. आंदोलनाचे कामकाज आता आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे. त्यामुळे आंदोलनाचे सगळे काम राळेगण सिद्धी येथून केले जात आहे. इंडिया अगेन्स्‍ट करप्शनचाही अण्णांशी आता संबंध राहिलेला नाही.